कुतूहल न्यूज नेटवर्क
राज्यातील पहिला प्रयोग; चोराखळीचा धाराशिव साखर कारखाना करणार इथेनॉलपासून ऑक्सिजनची निर्मिती
उस्मानाबाद: सध्या कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावामुळे ऑक्सिजनचा संपूर्ण राज्यात तुडवडा निर्माण होत आहे. ऑक्सिजनच्या तुडवड्यावर पर्याय काढण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखान्यांनी वसंत दादा इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्मिती करण्याचे अवाहन केले होते. त्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्याने इथेनॉलपासून ऑक्सिजन निर्मितीचा पायलट प्रोजेक्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्यात या प्लँटचे काम सुरू झाले असून, येत्या सोमवार पर्यंत ऑक्सिजन निर्मितीला प्रत्यक्षात सुरुवात होईल. तसेच हा प्रकल्प पूर्ण होऊन दररोज साधारण 20 टन ऑक्सिजन उपलब्ध होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिली आहे.
दि. 23 एप्रिल रोजी वसंतदादा इन्स्टिट्यूटने राज्यातील प्रमुख साखर कारखानदारांची झूम मीटिंगद्वारे मीटिंग मध्ये धाराशिव साखर कारखान्याने चेअरमन अभिजीत पाटील यांनी ऑक्सिजन तयारी दर्शविल्याने साखर संघाच्या वतीने त्यांना रीतसर परवानगी देण्यात आली होती. वसंतदादा इन्स्टिट्यूट व मौज इंजिनिअरिंग टेक्निकलच्या माध्यमातून ही प्रक्रिया होणार आहे.
या प्रोजेक्टच्या कामाची जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दि. 29 रोजी पाहणी केली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शिवलेश्वर स्वामी, कळंब उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, तहसीलदार रोहन शिंदे, महसुल मंडळ अधिकारी डी.एम.कांबळे, तलाठी एस.जी.कावळे, एस. आर.सय्यद उपस्थित होते.