कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी तालुक्यातील घटना; कारवाईसाठी गेलेल्या पोलीसाला लाकडी दांड्याने मारहाण
बार्शी: वाळू चोरांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास लाकडी दांड्याने मारहाण करून येथुन पुढे वाळू कारवाईला यायचे नाही, असे म्हणून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील भोईजे येथील घोर ओढ्याजवळ घडला. प्रविण शहाणे असे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणात आठ जणावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत.
कृष्णा उर्फ बबल्या कल्याण जाधव, सोमनाथ सत्यवान मुळे, विजय अर्जुन निकम, चेतन भिमराव नवले, अजित अर्जुन निकम, अजित सुरवसे, भाऊ महादेव चव्हाण व अतुल धनाजी कवटे सर्व रा. भोईंजे ता. बार्शी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.
जखमी पोकॉ प्रविण शहाणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते पोलीस ठाणेस असताना खांडवी बिट अंमलदार यांनी फोनद्वारे कळविले की, बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, भोईंजे ता. बार्शी येथील घोर ओढ्यात अवैध वाळू उपसा सुरू आहे. सदरबाबत सपोनि शिवाजी जायपत्रे यांना कळविले असून सदर ठिकाणी छापा कारवाई करणे करीता शेंद्री फाटा येथे येण्यास सांगितले.
त्यावरून फिर्यादी हे मोटारसायकलवरून शेंद्री फाटा येथे आले व गाटे, धुमाळ असे भोईंजे ता. बार्शी येथील घोर ओढयाकडे दोन मोटारसायकलवरून जात असताना घोर ओढ्याचे अलिकडे रस्त्याचे बाजूला शेतामध्ये काही इसम बसलेले दिसले. त्यांनी त्यांचे जवळ थांबुन आम्ही पोलीस असल्याचे सांगुन त्यांना येवढ्या उशिरा येथे थांबण्याचे कारण विचारले असता त्यांनी काहीएक समाधान कारक उत्तर दिले नाही. त्यामुळे आम्ही त्यांचे पासुन पुढे 500 मी अंतरावर असलेल्या घोर ओढ्याकडे जात असताना त्यांचे पैकी एक इसम त्याचे अंगात विटकरी रंगाचा टी शर्ट घातलेला त्यांच्या जवळ आला व त्याने पोलिसांना तुम्ही पुढे ओढ्याकडे जायचे नाही असे म्हणून मोटारसायकल समोर आडवा उभा राहिला.