कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शीत लसीकरण प्रक्रियेत पारदर्शकता आणावी; नागेश अक्कलकोटे
बार्शी प्रतिनिधी : बार्शी येथील कोरोना लसीकरण प्रक्रियेत सुसूत्रता आणि पारदर्शकता आणावी अशी मागणी नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, कोरोना (कोव्हीशिल्ड) लसीकरण मोहिमेतील अक्षम्य चुका, नियोजनाचा अभावमुळे बार्शीकर नागरिकांना मनस्ताप, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे .
सध्या सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत ४५ वयानंतरच्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तासनतास रांगेत उभे राहूनही लस न मिळणे, रांग सोडून वशिलेबाजी ने लस देणे यामुळे सामान्यांनाचा असणारा लसीचा हक्क अधिकार डावलला जातो आहे. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन येथील चित्र अत्यंत वाईट आहे. आजारी वयोवृध्द नागरिकांना झालेला त्रास न पहावणार होता. अक्षरशः लोक रडकुंडीला आले होते .
बार्शी शहरात वॉर्ड निहाय उपलब्ध असणाऱ्या खाजगी दवाखाने यांचे सहकार्य घेऊन लसीकरण मोहीम त्या ठिकाणी राबविण्यात यावी .लस वाहतुकीवेळी तापमान मेंटेन राहणेसाठी रामभाई शाह रक्तपेढीची वातानुकूलित गाडीचा वापर करता येईल. ज्या नागरिकांनी पहिला डोस सशुल्क खाजगी दवाखान्यात तसेच सरकारी केंद्रावर निशुल्क घेतलेला आहे आणि त्यांचे ५० हून अधिक दिवस पूर्ण झालेले आहेत त्यांना प्रधान्याने लस देण्यात यावी. सोशल डिस्टनसिंगचा उडालेला फज्जा पाहता लसीकरण मोहिमेचे जास्तीत जास्त लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावेत. अनावश्यक गर्दी टाळणेसाठी टोकन पद्धत अथवा १८ ते ४४ साठी राबवलेली ऑनलाईन पद्धत राबविण्यात यावी.