पांगरी ता बार्शी : कुतूहल न्यूज नेटवर्क
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देश लॉकडाऊन आहे तसेच संचारबंदी सुरू आहे.प्रशासन वारंवार फक्त अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडा हे सांगत असताना सुद्धा काही लोक अजून मोकाट फिरत आहेत अश्याच लोकांच्या वाहनांवर पोलीस कारवाई करत आहेत.मोकाट फिरणाऱ्याला फोडून काढून त्यांची वाहने जप्त करण्यात येतील व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच जर कोणी तोंडाला मास्क न लावता मिळाल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे सहायक पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी कुतूहल न्यूजशी बोलताना सांगितले.
ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रविण सिरसाट,पोलीस हवालदार अमोल अवघडे व आदीं पोलिस कर्मचारी करीत आहेत.