मळेगाव (अशोक माळी): मळेगाव ता.बार्शी येथे श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उपसरपंच धीरज वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे सुपुत्र असल्याने रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजे अभ्यासात अत्यंत हुशार होते. त्यांनी संस्कृत भाषेवर विशेष प्रभुत्व मिळवले होते व वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी बुधभूषण व राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला. याशिवाय नाईकाभेद, नखशिखा, सातसतक या ग्रंथाची निर्मिती केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखाच शभुराजेंनी शत्रूविरोधात जोरदार लढा दिला. गोव्याच्या मोहिमेप्रसंगी घोड्यावर बसून मांडवी नदी ओलांडली होती. गोव्यात जाऊन पोर्तुगीजाला असा सज्जड दम भरला होता की, पुन्हा पोर्तुगीज संभाजीराजेंच्या वाटेला गेला नाही. अशा राजाची जयंती मळेगाव येथे साजरी केली.
यावेळी सरपंच संजयकुमार माळी, यशदाचे शिवाजीराव पवार, श्री शिवाजी तरुण मंडळाचे उपाध्यक्ष नितीन पवार, सावता परिषदेचे युवक अध्यक्ष अशोक माळी, अन्नपूर्णा योजनेचे सचिव यशवंत गाडे, ग्रामपंचायत क्लार्क सुरेश कांबळे, संगणक परिचालक प्रशांत पटणे, मंडळाचे नागेश माळी, नितीन गोरे, रोहित झुंडरे, मुन्ना शेख आदी मान्यवर उपस्थित होते.