fbpx

बार्शीत ५०० बेडचे बाल कोवीड हेल्थ सेंटर व हॉस्पिटल उभारणार : आमदार राऊत

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : भविष्यातील कोरोनाच्या लाटेचा धोका ओळखून त्याची पूर्वतयारी करण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शीतील सर्व बालरोग तज्ज्ञांची बैठक घेतली. या बैठकीत सर्वांशी सल्लामसलत, चर्चा करून, त्यांचे मार्गदर्शन घेऊन, एकमेकांच्या सोबतीने बार्शी शहर व तालुक्यासाठी लवकरच बार्शीत बालकांसाठी डेडिकेटेड कोवीड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटल उभारणीचा निर्णय घेण्यात आला.

कोरोना विषाणूचा दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावात काही प्रमाणात बालकांना कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे भारतात कोरोनाची तिसरी लाट जुलै ते ऑगस्ट दरम्यान येण्याची शक्यता पाहता या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोनाची लागण होऊ शकते असेही तज्ञ मंडळींकडून सांगण्यात येत आहे. यावेळी बाल कोवीड सेंटर उभारणीच्या आवाहनाला सकारात्मकपणे तयारी दर्शवून होकार दिल्याबद्दल आमदार राऊत यांनी बार्शी शहर व तालुक्याच्या वतीने सर्व बालरोग तज्ञ डॉक्टरांचे आभार व्यक्त केले. तसेच या बाल कोवीड सेंटर उभारणीकरिता शासन पातळीवरील सर्वतोपरी मदत करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचेही यावेळी आमदार राऊत यांनी म्हंटले आहे.

या बैठकीस नगराध्यक्ष ॲड. आसिफ तांबोळी, तहसीलदार सुनील शेरखाने, मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक ढगे, ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. शितल बोपलकर, डॉ. जयवंत गुंड, जगदाळे मामा हॉस्पिटलचे डॉ. बी. वाय. यादव, बालरोग तज्ञ डॉ. प्रसाद कुलकर्णी, डॉ. सुनील पाटील, डॉ. प्रशांत मोहिरे, डॉ. हरीश कुलकर्णी, डॉ. अमित लाड, डॉ. आनंद मोरे, डॉ. जितेंद्र तळेकर, डॉ.अबिद पटेल, डॉ. विजयसिंह भातलवंडे, डॉ. स्वाती भातलवंडे, डॉ.युवराज रेवडकर, डॉ. रोहिणी कोकाटे, डॉ. संदीप पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *