कुतूहल न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी : दयानंद गौडगांव
सोलापूर: कोरोनाच्या संकटात देशात, राज्यात अनेक उलाथापालथ झाल्या. अनेक प्रश्न नागरिकांच्या समोर उभे राहिले आहेत. मात्र या प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष होतं असल्याने राज्यातील अनेक ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सामाजिक लढा द्यायला सुरवात केली आहे. यामध्ये शाळेची फी माफी, कर्ज वसुली, लाईटबील शेतकऱ्यांचे प्रश्न अशा अनेक विषयांवर एकत्र येऊन कामं सुरु केल्यानंतर या समूहाने क्रांतीकारी आवाज या संघटनेची स्थापना केली आहे. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर या संघटनेची कार्यकारिणी कार्यरत झाली आहे.
क्रांतीकारी आवाज संघटनेची राज्य कार्यकारिणी जाहीर ; जलकन्या भक्ती जाधव यांची राज्याच्या उपाध्यक्ष पदी निवड
याबाबत सविस्तर माहिती अशी की, क्रांतीकारी आवाज या संघटनेची स्थापन झाल्यानंतर या संघटनेची पाहिली कार्यकारणी घोषित करण्यात आली असून या मध्ये संस्थापक व कार्याध्यक्ष मच्छिन्द्र टिंगरे (बारामती), रवींद्र टकले अध्यक्ष (बारामती,जलकन्या भक्ती जाधव, उपाध्यक्ष (सोलापूर), नीता सोनवणे-उपाध्यक्ष नागपूर, भारत मते उपाध्यक्ष (मुबंई), मयूर सोळसकर सचिव (दौंड), सागर शिंदे सहकार्यवाहक (सोलापूर), स्वप्नील हवालदार प्रदेश सरचिटणीस (शिराळा), वीरभद्र कावडे सदस्य (सातारा), हनुमंत वीर सदस्य (इंदापूर), शितल मोठे (करमाळा), राज्यसंघटक मनोज पवार (बारामती), सागर पोमन यांची सदस्य आणि प्रदेश युवक अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. संघटनेच्या प्रवक्ता म्हणून डॉ.गणेश शिंदे (पुणे) यांची निवड झाली आहे.
ही सर्व करिकारिणी संघटनेचे ध्येय आणि उद्दिष्टे महाराष्ट्रातील तळागाळात पोहचवणार असल्याची माहिती राज्याच्या उपाध्यक्ष भक्ती जाधव यांनी दिली आहे.