कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: महाराष्ट्राच्या क्रीडा चळवळीत व शारीरिक शिक्षण क्षेत्रात विशेष नाव असलेले डॉ.जगदीश झाडबुके यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण, क्रीडा व स्पर्धा अभ्यास मंडळावर निवड झाली आहे. ते सध्या बार्शीच्या श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात कार्यरत आहे.
डॉ. जगदीश हे गेल्या 40 वर्षांपासून क्रीडा विकास आणि शारीरिक शिक्षण विकास चळवळीत सक्रीय आहेत. त्यांनी केलेले संशोधन क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देणारे ठरलेले आहे. त्यांनी लिहिलेली पुस्तकेही उल्लेखनीय ठरली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि विद्यापीठ पातळीवरील क्रीडा स्पर्धांच्या नियोजन-आयोजनात नेहमीच पुढे राहिले आहेत. झाडबुके यांच्या या यशाबद्दल त्यांच्या मित्रपरिवाराकडून त्यांचं कौतुक होत आहे. ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनीही, आम्हा मित्रांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला याचा मला आणि मित्रमंडळींना अभिमान वाटतो, असे म्हटलंय.