कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: बार्शी तालुक्यातील पांगरी ग्रामपंचायत कार्यालयात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शासनाने दिलेल्या नियमांच्या अधीन राहून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.
पांगरी ग्रामपंचायतीत शिवराज्याभिषेक दिन
सरपंच सुरेखा लाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून ग्रामपंचायत कार्यालयासमोर भगवा ध्वज फडकाऊन गुढी उभारण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी उपसरपंच धनंजय खवले, माजी सरपंच तात्या बोधे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुहास देशमुख, शहाजी धस, रियाज बागवान, डॉ. विलास लाडे, गणेश गोडसे, विजयकुमार माळी व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.