बार्शी : कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शीत पंचशील तरुण मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबिर,गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे वाटप
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंचशील तरुण मित्र मंडळ लातूर रोड बार्शी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात बार्शी नगरपालिकेचे गटनेते विजय राऊत, नगरसेवक संजय शिंदे,रोहन गायकवाड, नागनाथ सोनवणे , पाचू उघडे, लक्ष्मण रिकिबे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. रक्तदान शिबिरामध्ये 61 रक्तदात्यांनी सोशल डिस्टन्स ठेवून रक्तदान केले त्याच बरोबर लोकमान्य तरुण मित्र मंडळाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य चाळ लातूर रोड या ठिकाणी असणाऱ्या गरजू हातावर पोट असणाऱ्या 80 कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य चे वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष विकास चौधरी, उपाध्यक्ष अक्षय रिकीबे, खजिनदार अनंत लंकेशवर,नितिन गाडे, बप्पा जानराव, गणेश कदम,विष्णू कदम,आनंद माने,दिलीप रिकीबे, सचिन लंकेशवर, पांडू रिकीबे,सागर भालेराव रवि माने आदींचे मोलाचे योगदान लाभले.