fbpx

राहिलेल्या शेतकऱ्यांच्या पिकविम्यासाठी पुणे येथे शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन; तोडफोडीनंतर कंपनी व पोलीसांची धावपळ

कुतूहल न्यूज नेटवर्क 
पुणे : दयानंद गौडगांव
दि. २३ जून रोजी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली मागील महिन्यात उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांच्या भारती अक्सा पिकविमा कंपनीच्या ढोले पाटील मार्गावरील पुणे येथील राज्यस्तरिय कार्यालयावर झोपा व मुक्काम आंदोलनानंतर शेतकऱ्यांचे पैसे मिळाले असले तरी राज्यातून अजूनही अनेक शेतकरी वंचित असल्याचे फोन सतत येऊ लागल्यामुळे पंधरा जून पासून पुन्हा गायकवाड यांचे नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचे निवेदन देताच कंपनीने भितीपोटी कार्यालय बंद ठेवून आतमध्ये गुपचूप कामकाज सुरू असल्याचे समजताच आज अचानक गायकवाड यांनी कार्यालयाबाहेर ठिय्या मांडुन पुन्हा आंदोलन सुरू केले.

त्यावेळी काही संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयाची तोडफोड सुरू करताच कंपनीचे व्यवस्थापक गोपाळ सोनवणे हे पोलीसांना बरोबर घेऊन आंदोलन स्थळी धाव घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची कागदापत्रे घेत लवकरच खातेवर रकमा जमा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आदोलन स्थगित करण्यात आले. त्यावेळी दयानंद चौधरी, गोटू पाटील, पोपट चौधरी, बाळासाहेब भायगुडे, विठ्ठल पाटील, मनोज चौधरी, संदिप चौधरी, अमोल चौधरी, माणिक चौधरी, अरविंद चौधरी, बजिरंग चौधरी, बाजीराव चौधरी, सुरज चौधरी, ज्ञानेश्वर पाटील, लालासाहेब गायकवाड, दत्तात्र्य पाटील, संतोष गुंड, रूषिकेश गायकवाड, अंबरीष गायकवाड, विनोद गायकवाड, दिपक पाटील, प्रतिकेत गायकवाड, श्रीबाल गायकवाड, विकास गायकवाड, हनुमंत गायकवाड, शैलेंद्र पाटील, अतुल गायकवाड, राकेश विधाते, नागेश पाटील, धनाजी आगलावे, सुशांत गव्हाणे, नारायण कदम, विजय नागटिळक, गणेश नागटीळक, विशाल नागटीळक आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *