fbpx

झेपत नसेल तर राजीनामा द्या, महापौर मोहोळ यांना सुप्रिया सुळेंनी झापलं

कुतूहल न्यूज नेटवर्क
पुणे:
स्थानिकांच्या विरोधानंतर देखील पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली होत. या मुद्यांवरून राजकारण चांगलेच तापू लागले होते. त्यातच स्थानिक आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं होते. आता या घटनेवर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्याच्या घटनेची चौकशी व्हावी. महापौरांनी उत्तर द्यावे. आंबिल ओढ्यावरील कारवाई कुणी केली हे सर्वांना माहिती आहे. पुणे महापालिकेत सत्ता कुणाची आहे तर भाजपची. त्यामुळे महापौरांना जर झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. (NCP MP Supriya Sule demands resignation of Pune Mayor Murlidhar Mohol after action on Ambil Odha)

सुप्रिया सुळे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सुरु असलेल्या ED च्या छापेमारीवरुनही भाष्य केलं. “राजकारण हे विचांरांचं असतं. ते लोकांसाठी करायचं असतं. आजपर्यंत तपास यंत्रणांचा वापर आपल्या विरोधकांसाठी करतात हे यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं. यंत्रणांचा गैरवापर आपण पाहात आहोत. पवरा साहेबांनाही नोटीस पाठवली होती. राजकारण विचारांचं असावे. मात्र नवी नियमावली यांनी काढली आहे” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *