fbpx

मळेगाव येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी

कुतूहल न्यूज नेटवर्क
मळेगाव (अशोक माळी):
मळेगाव ता.बार्शी येथे श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिलावर पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.

ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी प्रयत्न केले. सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित अस्पृश्य व मागासवर्गीय समाज्याच्या विकासासाठी महत्वाची भूमिका बजावली महाराजांना ‘राजर्षी’ ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाज्याने दिल. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखतात.

यावेळी उपसरपंच धीरज वाघ, पोलीस पाटील ज्ञानेश्वर माळी, ग्रा.प.सदस्य समाधान पाडुळे, सावता परिषदेचे युवक अध्यक्ष अशोक माळी, मंडळाचे गिरीश माळी, यशवंत गाडे, लक्ष्मण सुरवसे, ग्रामपंचायत क्लार्क सुरेश कांबळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *