fbpx

पांगरी येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन

कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी:
येथील राजीव गांधी केंद्रीय आश्रम शाळेत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका किरण बगाडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपमुख्याध्यापक रामकृष्ण मुळे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. शिवाजी बागडे व संजय सोनवणे यांनी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. अक्षय मुंडे यांनी आभार मानले. यावेळी अधीक्षक वाहिद शेख, शैलेजा राऊत, श्रेया बाराते, रेणुका लुंगारे, गणेश गोडसे, अक्षय चांदणे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *