fbpx

आम्ही पण बघून घेऊ, अनिल देशमुख प्रकरणावरुन संजय राऊतांचा भाजपला इशारा

कुतूहल न्यूज नेटवर्क
मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात ईडीनं केलेल्या कारवाईवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा मुद्द्यावर बोलताना संजय राऊत भाजपवर चांगलेच भडकलेत.

राज्यातील तपास यंत्रणा सक्षम असताना केंद्रीय यंत्रणा मागच्या दाराने आणल्या जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. राज्यातील नेते, मंत्र्यांवर काही आरोप असतील तर राज्यातील तपास यंत्रणा चौकशी करण्यास सक्षम आहे हे आम्ही वारंवार सांगत आलोय. पण शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्ही पक्षांच्या नेत्यांना मुद्दाम ठरवून त्रास दिला जात आहे. आम्ही पण बघून घेऊ, अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपला इशारा दिला.

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या घरावर आणि कार्यालयावर ज्या धाडी पडल्या, त्याचे कारण भाजपची निराशा आहे. भाजपला सरकार बनवता आलेले नाही, त्यामुळे ते निराश झालेत. हे सर्व निराशेतून केले जात आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना आणि मंत्र्यांनाही त्रास दिला जात असल्याचं संजय राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *