कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी तालुक्यातील पांगरी गणाचे पंचायत समिती सदस्य तथा बार्शी पंचायत समिती गटनेते सुंदरराव जगदाळे यांची महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या बार्शी तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या विविध मागण्या, अडचणी शासन दरबारी पोचविण्यासाठी व या सदस्यांच्या निधीच्या माध्यमातून आपापल्या मतदारसंघांमध्ये विविध विकासात्मक कामे लवकर मार्गी लावण्यासाठी, वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कार्यरत राहणार असल्याचे असोसिएशनचे नूतन कार्याध्यक्ष सुंदरराव जगदाळे यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले.
पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या बार्शी तालुका कार्याध्यक्षपदी सुंदरराव जगदाळे
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य या संघटनेचे सदस्य असणार आहेत. सध्या इतर काही संस्थांच्या सदस्यांपेक्षा जि.प. व पं.स. सदस्यांना विकास निधी कमी मिळत आहे. जिल्हा परिषद सदस्यांना सुमारे 25 हजार तर पंचायत समिती सदस्यांना 14 ते 16 हजार मतदारांनी निवडून दिलेले असते. प्रत्येक सदस्यांना त्यांच्या कामाचा निपटारा करण्यासाठी ही संघटना कार्यरत राहणार आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे पाटील, राज्य अध्यक्ष भारत शिंदे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष नितीन नखाते यांनी त्यांना निवडीचे अधिकृत पत्र दिले. जगदाळे हे चारे येथील रहिवासी आहेत. निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.