कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शीतील कर्तव्य जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने गरजूंना मोफत अन्नदान
बार्शी प्रतिनिधी -शहरातील कर्तव्य जनसेवा फाऊंडेशनच्या अंतर्गत प्रशांत कथले ( पी.के. )मित्र परिवार व राहुल कुंकूलोळ ( आर.के. ) मित्र परिवार यांच्या माध्यमातून दिनांक 9 एप्रिल पासून रोज रात्री 6 वाजल्या पासून बार्शी शहरातील सर्व गोरगरिबांना, बेरोजगार व्यक्ती, दवाखान्यातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना मोफत अन्नदान सुरु करण्यात आले आहे. याबाबतची माहिती देताना कथले व कुंकूलोळ म्हणाले की, कोरोना या महाभयंकर आजारामुळे संपुर्ण भारत देश लॉक डाऊन केलेला आहे त्यामुळे संपुर्ण बार्शी शहर बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांच्या सोयीसाठी तसेच शहरातील विविध दवाखान्यात असलेल्या रुग्णांची रात्रीच्या जेवणाची सोय व्हावी या उद्देशाने हे अन्नदान करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शहरातील विविध भागात राहणाऱ्या गोरगरीब नागरिकांसाठी सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून घरपोच जेवणाचे पाकीट पोहोच केली जात आहेत. साधारणपणे रोज रात्री 1200 पाकीटांचे वितरण केले जात असून हा उपक्रम सरकार जोपर्यंत लॉक डाऊन उठवित नाही तोपर्यंत चालू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी प्रशांत कथले,राहुल कुंकूलोळ यांच्यासह हर्षद बलदोटा,विक्रांत बेळे,राजेश झाडबुके,बाळासाहेब बेळे,पद्माकर झालटे(पाटील),अशोक परमार,अरुण येळे,यश शहा,आनंद लुगारे व सागर स्वामी उपस्थित होते.
महेश फरकांडे, राजाभाऊ गोसावी, वैभव बोथरा, अमित बोथरा, महेंद्र कथले,आप्पा घबाडे,बोथरा परिवार यांच्यासह पी.के व आर.के मित्र मंडळाचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.