कुतूहल न्यूज नेटवर्क
शनिवारी साजन प्रकाश या स्वीमरनं एक इतिहास रचला. रोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या सेटे कॉली ट्रॉफीमध्ये पुरूषांच्या गटात २०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत साजननं १ मिनिट ५६.३८ सेकंदाची वेळ घेत क्वालिफाय करणारा पहिला भारतीय स्वीमर बनण्याचा मान मिळवला आहे.
साजन प्रकाशने रचला इतिहास; Olympic मध्ये थेट प्रवेश करणारा ठरला पहिला भारतीय स्वीमर
साजननं ही फेरी १ मिनिट ५६.४८ सेकंदाच्या ए क्वालिफिकेशन मार्कपेक्षा चांगली आहे. यापूर्वी सहा भारतीय स्वीमर्सनं २०१९-२० च्या ऑलिंपिक स्पर्धेत क्वालिफिकेशन कालावधीत बी क्वालिफिकेशन मिळवलं होतं. बी क्वालिफिकेशन एक वाईल्ड कार्ड एन्ट्री आहे. यापूर्वी अनेक भारतीय स्वीमर्सनं ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला होता. परंतु कोणत्याही स्वीमरला थेट ए क्वालिफिकेशन मार्क तोडून थेट क्वालिफाय करण्यात यश मिळालं नव्हतं.
Sajan Prakash becomes the 1st Indian swimmer to qualify for Tokyo 2020 as he clocks 1:56:38 in men’s 200m butterfly at the Sette Colli Trophy in Rome. The qualification cut-off was 1:56:48: Sports Authority of India pic.twitter.com/CvRqqIimQZ
— ANI (@ANI) June 26, 2021