कुतूहल न्यूज नेटवर्क
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युनियन बँकेकडून सोशल डिस्टेंसिंग नुसार कामकाज सुरु
बार्शी प्रतिनिधी : बार्शीतील शिवाजी कॉलेज रोड पाटील कॉम्पलेक्स येथे असलेल्या युनियन बँक ऑफ इंडिया बँकेच्या शाखेत कोरोना या महाभयंकर आजाराचे गांर्भीय लक्षात घेत बँकेने ग्राहकांची व अधिकारी तसेच कर्मचारी यांची विशेष दक्षता घेतली आहे. बँकेची सेवा ही विशेष आपातकालिन सेवा यामध्ये येत असल्याने सरकारने देशभरातील सर्व बँकाचे कामकाज चालू ठेवले आहे.कोरोना मुळे सर्व ठिकाणी लॉक डाऊन असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असून त्यासाठी सरकारने पंतप्रधान जनधन योजना, पंतप्रधान उज्वला योजना, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना आदी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये काही रक्कम जमा केली आहे.यामुळे लाभार्थ्यांनी हे पैसे काढण्यासाठी विविध बँकात गर्दी केली आहे. याची खबरदारी घेत येथील युनियन बँकेच्या शाखेत कर्मचाऱ्यांसाठी हॅण्ड ग्लोज, मास्क,सेनिट्रायझर आदींची व्यवस्था करण्यात आली असून ऑफिसमध्ये किटक नाशकांची फवारणी करण्यात आली आहे.
बँकेत येणाऱ्या ग्राहकांसाठी एकमेकांमध्ये अंतर (सोशल डिस्टेंसिंग ) ठेवून गर्दी होऊ नये म्हणून ठराविक अंतरावर वर्तुळे काढली आहेत तसेच प्रवेशद्वाराजवळ दोन शिपाई नियुक्त केले असून ग्राहकांसाठी हात स्वच्छ करण्यासाठी त्यांना सेनिट्रायझरचा वापर करुनच प्रवेश देण्यात येत आहे तसेच बँकेत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांना बँक कर्मचाऱ्यांकडून कोरोनाबाबत जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती शाखाधिकारी वैभव जगताप यांनी दिली.
यासाठी बँकेचे शाखाधिकारी वैभव जगताप, उपशाखाधिकारी प्रवीण खटकाळे, सहाय्यक प्रबंधक गौरव गौड, बँकेचे क्लार्क सुदर्शन अग्निहोत्री, विकास जाधव, कॅशियर चंद्रकांत फुले,कर्मचारी सागर नेलुरे,इम्रान शेख, श्रीमती बिल्कीस पठाण आदींचे सहकार्य लाभत आहे.