कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने सामाजिक जबाबदारी जपत कोरोणाच्या पार्श्वभूमीवर बार्शी तालुक्यातील सहा गावातील शंभर गरजुंना किराणा किटचे वाटप करण्यात आले. तसेच तीन गावात महिला सक्षमीकरणासाठी 60 सॅटो टॅप मशीनचेही वितरण करण्यात आले.
स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने गरजूंना किराणा किटसह सॅटो टॅप मशीन वाटप
सध्या कोरोनामुळे गरिबांच्या हाताला काम नाही, त्यामुळे मदतीचा हात म्हणून स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने गरजूंना किराणा किट वाटप करण्यात आले. संगीता चांदणे, तालुका समन्वयक.
किट वाटप कार्यक्रम प्रसंगी पांगरीच्या सरपंच सुरेखा लाडे, विलास लाडे, तात्या बोधे, शुभांगी कुंभार, नंजुमन शेख उपस्थित होते. संस्थेच्या संचालिका प्रेमा गोपालन, उपमन्यू पाटील, प्रोजेक्ट मॅनेजर काका आडसुळे, तालुका समन्वयक संगिता चांदणे आदींनी यासाठी परिश्रम घेतले.