fbpx

बार्शीत डाॅक्टरच्या घरावर चोरट्याने केला हात साफ

कुतूहल न्यूज नेटवर्क 
बार्शी:
घरातील सर्वजन बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी डाॅक्टरच्या घरावर हात साफ करत  ७२ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचा प्रकार बार्शीतील मनगिरे मळ्यात घडला.

जगदीश शिवरूद्र मिरजकर (वय 67 वर्ष) हे त्यांच्या मुलीच्या नविन घराचे वास्तुशांतीचा कार्यक्रम असल्यामुळे ते कुटुंबासह पुणे येथे गेले होते. कार्यक्रम आटपुन त्यांनी त्यांच्या घरी घरकामास असणाऱ्या बाईंना फोन करून आम्ही पुणे येथुन निघालो आहोत, तू आमच्यासाठी जेवन तयार करून ठेवा असे सांगितले. त्यानंतर अर्ध्या तासाने घरकामास असणाऱ्या बाईनी त्यांना फोनवर सांगितले की, घराचे कुलुप तुटलेले आहे. घरातील दुमजली कपाटातील साहीत्य अस्थाव्यस्थ पडलेले आहे.

घराचा कडी कोयंडा तोडून घरातील लोखंडी कपाटातील कपडे टाकून चोरट्यांनी एक सोन्याची अंगठी, एक चांदीची अंगठी, मुलीची सोन्याची अंगठी, कानातील सोन्याचे कर्णफुले, लहान नातीच्या तीन अंगठ्या, चांदीचा हळदीकुंकाचा कंरडा, एक चांदीचा छल्ला, चांदीचा गणपती, चांदीचे शिवलिंग, टीव्ही असा एकूण ७२ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याची फिर्याद जगदीश मिरजकर यांनी पोलिसात दिली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *