कुतूहल न्यूज नेटवर्क
पुणे, दि.२९ जून: शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली शिष्ठमंडळाने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे पुणे येथील कार्यालयात भेट घेऊन राज्यातील विविध बहुसंख्य साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची मागील व चालू हंगामातील थकलेली ऊसबिले व्याजासह तात्काळ जमा करण्यासाठी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
शेतकरी संघटनेचे साखर आयुक्तांना निवेदन
राज्यातील सर्व शेतकऱ्यांची थकीत उसबिले व्याजासह मिळवून देण्याची जबाबदारी साखर आयुक्त यांची असून जर त्यांनी पंधरा दिवसात राज्यातील अशा सर्व साखर कारखान्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांची बिले मिळवून न दिल्यास आयुक्त कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असाही इशारा गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधी बोलताना दिला.
त्यावेळी लालासाहेब गायकवाड, दत्तात्र्य पाटील, संतोष गुंड, रूषिकेश गायकवाड, अंबरीष गायकवाड, दिपक गायकवाड, शंकर गायकवाड, अरूण जगदाळे आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.