कुतूहाल न्यूज नेटवर्क
नागपूर: एका महिला होमगार्डचा विनयभंग केल्याप्रकरणी नागपूरातील एका पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यशोधरानगर पोलीस ठाण्यात होमगार्ड पदावर कार्यरत असणाऱ्या महिलेनं हे आरोप केले आहेत. नागपूरच्या यशोधरानगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केली आहे.