कुतूहल न्यूज नेटवर्क
गौडगांव येथील शाळेच्या आवारात मोठया प्रमाणात दारूच्या बाटल्या
गौडगांव : सध्या लॉकडाऊन सुरू आहे तरी पण गौडगांव ता. बार्शी येथिल मल्टीपर्पज आदर्श न्यू इंग्लिश स्कुलच्या आवारात मोठ्या प्रमाणात दारूच्या मोकळ्या बाटल्या आढळून येत आहे.हे गावं सोलापूर -उस्मानाबाद जिल्हाहद्दीवर आहे. प्रशासन वारंवार फक्त अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडा हे सांगत असताना सुद्धा काही दारू पिणारे लोक रात्री अंधाराचा फायदा घेत या शाळेच्या आवारात दारू पीत आहेत. महत्वाचे म्हणजे लॉकडाऊनमध्ये दारू मिळतेच कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे.