कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बांधकाम करण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपये घेऊन येण्याच्या व चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा प्रकार बार्शीतील म्हाडा काॅलनीत घडला. अश्विनी भारत माने असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सीआरपीएफ (CRPF) जवानांसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सीआरपीएफ जवानांसह चौघांवर गुन्हा दाखल
अधिक माहिती अशी कि, मयत आश्विनी हिचा विवाह १८ डिसेंबर २०११ साली भारत माने (रा. दहिटणे ता. परांडा) हल्ली मुक्काम म्हाडा कॉलनी, गाडेगाव रोड बार्शी याचेशी झाला होता. भारत माने हा सीआरपीएफमध्ये २००३ पासून नोकरीस असून तो ड्युटी निमीत्त बाहेर गावीचं असतो. लग्नानंतर आश्विनीला एक वर्ष व्यवस्थीत नांदविले. त्यानंतर जावाई हा सुट्टीवरती आल्यानंतर आश्विनीला चारिञ्यावर संशय घेवून तिचेशी वारंवार भांडण करुन शिवीगाळी, मारहाण करून मानसीक व शारिरीक छळ करीत असे. त्यावरुन बार्शी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असून तो बार्शी न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे.
असे असले तरी आश्विनी त्याचेसोबत तडजोड करुन राहत होती. तरीही पती माने अधून मधून तिचे चारिञ्यावर संशय घेवून तिला मारहाण शिवीगाऴ करत असलेबाबत आश्विनीने अनेकदा आपल्या माहेरी सांगितले होते. सध्या त्यांचे राहते ठिकाणी त्यांना बांधकाम करावयाचे असल्याने पती माने सुट्टीवर बार्शी येथे आला होता. आश्विनीला घराचे बांधकाम करण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेवून येण्याबाबत सांगितले. मात्र मुलीने आश्विनीने वडिलांकडून पैसे आणणार नाही असे म्हणून स्पष्ट नकार दिला होता.
त्यानंतर आश्विनीने फोन वरून पती भारत सदाशिव माने, सासू कौशल्या सदाशिव माने, सासरे सदाशीव अर्जुन माने व दिर म्हसा सदाशिव माने( सर्व रा. दहिटणे ता.परांडा) हे सर्वजन पैसे घेवून येण्यासाठी वारंवार तगादा लावत असले बाबत वडील भुजंग भोसले यांना सांगितले होते. सासरच्या त्रासास कंटाळून आश्विनीने घरातील संडास मधील छताच्या अँगलला दाव्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्याद भुजंग भोसले यांनी दिली आहे. याबात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.