कुतूहल न्यूज नेटवर्क
पुणे : दयानंद गौडगांव
पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या एमपीएससीची ( MPSC) परीक्षा उत्तीर्ण केली. परंतू तरीही नोकरी न मिळाल्याने स्वप्निल लोणकर या २४ वर्षीय तरुणाने आत्महत्येचे पाउल उचलले. त्याचे अधिकारी होण्याचं स्वप्न अपूर्ण राहलं. स्वप्नीलने गळफास लाऊन आत्महत्या केली. एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही २ वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्निल हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यासारख्या कारणांमुळेही स्वप्निलवरील तणाव वाढत गेला. आत्महत्यापूर्वी स्वप्निलने पत्र लिहिलं.
MPSC मायाजाल आहे; वाचा स्वप्नीलचं आत्महत्येपूर्वी लिहिलेलं मन हेलावून टाकणारं पत्र
मन हेलावून टाकणारं स्वप्निलचं पत्र…
MPSC मायाजाल आहे, यात पडू नका. येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत फक्त वय आणि ओझं वाढत जातं. आत्मविश्वास तळाला पोहोचतो आणि स्वत: बद्दल शंका वाढत जाते. २ वर्षे झाली आहेत उत्तीर्ण होऊन आणि २४ वय संपत आलंय. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेलं कर्ज, खासगी नोकरी करून कधी ही न फिटू शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना! करोना नसता, सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या तर आज आयुष्य खूप वेगळं आणि चांगलं असतं. हवं ते, ठरवलं ते प्रत्येक साध्य झालं असतं. मी घाबरलो, खचलो असं मुळीच नाहीये, फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता! नकारात्मकतेची ही वादळं कित्येक दिवस ही मनात होती. पण काही तरी चांगल होईल, या आशेवर तग धरला होता. पण आता इथून पुढे आयुष्य सुरू राहू शकेल, असं काहीच उरलं नाहीये. यांस कोणतीही व्यक्ती कारणीभूत नसून हा माझा सर्वस्वी निर्णय आहे. मला माफ करा! मला डोनेशन करून १०० जीव वाचवायचे होते, ७२ राहिले… जमलं तर हे इतरांपर्यंत पोहोचावा, अनेक जीव वाचतील.