कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: मराठा आरक्षणासाठी सोलापूर येथे मोर्चासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्ते दादा गायकवाड, भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष राजर्षी डमरे-तलवाड, जिल्हा परिषद सदस्य मदन दराडे, पत्रकार आप्पा पवार यांच्यासह बार्शीतील ११ आंदोलकांना सोलापूर येथील बाळे येथे पोलीसांनी ताब्यात घेतले.

आज सोलापूर येथे आमदार नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी सोलापूरात मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने मोर्चासाठी परवानगी देणार नसल्याचे जाहीर केले होते. परंतू आंदोलकांची भूमिका मोर्चा काढण्याची होती. त्यामुळे बार्शीतूनही बरेच आंदोलक सोलापूर या ठिकाणी मोर्चासाठी गेले होते. यावेळी शंकर जाधव, नितिन आवटे, शंतनू पवार, सुरेश घोडके, सुमंत मोरे, मनोज मोरे, अमोल मोरे, शंकर गरड यांनाही अटक करून सोलापूर येथील केगाव प्रशिक्षण केंद्रात ठेवण्यात आले. यावेळी आंदोलकांनी आघाडी सरकारचा जाहीर निषेध करत घोषणाबाजी केली.