कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद:आसिफ मुलाणी
उस्मानाबाद तालुक्यातील श्री शिवाजी विद्यालय कारी येथील शिक्षक राजेंद्रसिंह चंद्रभान आगलावे हे ३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले .यानिमित्त शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला. आगलावे यांनी अनेक राष्ट्रीय कुस्ती खेळाडू घडविले त्यांना सोलापूर येथील यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाकडून ४ तर संभाजी ब्रिगेड कडून १ असे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
आदर्श शिक्षक राजेंद्रसिंह आगलावे ३१ वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त
शाळेकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक एम. एस. भुसारे, ए. एम. जोशी, डी. टी. सोनवणे, एल. एम. ढेंबरे, ए. आर. जाधव, एन. आर.चव्हाण, एस. एम. मनगिरे, आय. एम. शेख ,व्ही .बी. गायकवाड, व्ही. बी. वसावे, एस .पी. जगदाळे, ए.पी. कांदे, एस. लोहार, व्ही. संकपाळ, एस. एस .काळे, जी.ए. करळे, एस. एस. वाघे, शिक्षिका ताटे, शिक्षिका भोसले यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.