कुतूहल न्यूज नेटवर्क
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या २४ वर्षीय तरुणाने पुण्यात आत्महत्या केली होती. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र तथा मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी आज स्वप्निलच्या आई वडिलांची त्यांच्या मूळ गावी केडगाव तालुका दौड येथे जाऊन भेट घेतली. अमित ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळेसुद्धा आहेत.
अमित ठाकरेंनी घेतली स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांची भेट
”महाराष्ट्र सरकारमधील २ लाख पद रिक्त आहे हे सरकार झोपले आहे का? असं काही पाऊल उचलल्यानंतर सरकार जागे होणार आहे का? असा सवाल करीत सरकारवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. ठाण्याचे मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्यावतीनं २ लाखांचा चेक मनसे नेते अमित ठाकरे यांनी स्वप्नील लोणकरच्या कुटुंबाला दिलाय त्याच बरोबर पक्ष नेहमी पाठशी राहील असे आश्वासन ठाकरे यांनी दिले आहे.