कुतूहल न्यूज नेटवर्क
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव भागात जुन्या भांडणाचा राग मनात ठेवत सख्ख्या मोठ्या भावाने धाकट्या भावावर चाकूने वार करत हत्या केली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी भावाला पोलिसांनी अटक केली आहे.
मोठ्या भावाकडून धाकट्याची चाकूने वार करत हत्या; आरोपी भावाला अटक
दिंगाबर अमृतराव कल्याणकर (वय ४८ वर्ष) यांनी जुन्या भांडणाचा राग मनात ठेवत छोटा भाऊ अनिल अमृतराव कल्याणकर (वय ४५ वर्ष) याला घराजवळील रस्त्यावर अडवले. मागच्या भांडणावरुन दोघांमध्ये वाद होऊन बाचाबाची झाली. त्यानंतर दिगंबरने भावावर चाकूने वार केले. या हल्ल्यात भाऊ अनिल हा जागीच ठार झाला. हि घटना मंगळवार 6 जुलै रोजी सायंकाळी अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथे घडली आहे.
या प्रकरणी मयत अनिल कल्याणकर यांचा मुलगा ओम अनिल कल्याणकर याच्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.