कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: चोरी करून पळून जात असताना दोन दरोडेखोरांना पांगरी पोलीसांनी ग्रामस्थांचा मदतीने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ४ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सतीश अच्युत पवार (वय २५) रा. सोनी जवला ता. केज व आकाश सुदाम पवार (वय २०) रा. बुक्कनवाडी ता. उस्मानाबाद अशी अटक करण्यात आलेल्या संशयित दरोडेखोरांची नावे आहेत.
दोन दरोडेखोरांना पांगरी पोलीसांनी केली अटक; ४ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दिनांक ७ जुलै २०२१ रोजी फिर्यादी अक्षय दशरथ चव्हाण (रा. सावडी ता. करमाळा) यांचे हातपाय बांधून, लोखंडी पाईपाने मारहाण करून १४ हजार ४०० रुपयाचे अंदाजे १५० लिटर डिझेल, पॉकेट व मोबाईल नेलेबाबत गुन्हा दाखल झाला होता.
चोरी करून चोर पळून जात असलेबाबत पोलीसांना समजताच पोलीसांनी नारी, चिखर्डे व नारीवाडी गावातील नागरीकांना फोन करून गावातील लोकांना सतर्क करून पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि सुधीर तोरडमल यांचे सुचनेप्रमाणे पोना पांडुरंग मुंडे, पोना सुनिल शिंदे, पोकॉ सुनिल बोदमवाड, पोकॉ सुळे, पोकॉ गणेश घुले, पाहेकॉ सतिश कोठावळे, पोहेकॉ मनोज भोसले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून गावातील लोकांच्या मदतीने दोन चोरट्यांना पकडून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची झडती घेतली असता एका आरोपीकडे गुन्ह्यात चोरीस गेलेले फिर्यादीचे पॉकेट मिळून आले. या गुन्ह्यात अटक करून त्यांचेकडून गुन्ह्यात वापरलेले पिकअप (MH 04 FJ 9554), चार मोबाईल, १५० लिटर डिझेल, डिझेल चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेला हातपंप व पाईप असा एकूण ४ लाख ४५ हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उप विभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सुधीर तोरडमल व त्यांची टिमने पार पाडली आहे.