कुतूहल न्यूज नेटवर्क
गोरमाळे गावाने दिली पोलिसांना पोहच पावती
पांगरी : बार्शी तालुक्यातील गोरमाळे येथे पांगरी पोलिस स्टेशनच्या पोलिसांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला.
अखिल मानव जातीवर कोरोना विषाणू संसर्गाचे संकट आले आहे. या आणीबाणीच्या स्थितीतही पोलीस कर्मचारी जीवाचे रान करून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करत आहे. शासनाच्या आदेशाची पोलिस अंमलबजावणी दिवसरात्र राबून करतात. या संसर्गाचा धोका ओळखूनही प्रत्येकजण राबत आहेत तसेच आपल्या जीवाची पर्वा न करता लोकहितासाठी रस्त्यावर उतरून चोख कामगिरी बजावत आहेत.त्यांच्या याच कामगिरी बदल पोहच पावती म्हणून गोरमाळ्याच्या गावकऱ्यांनी सोशल डिस्टन्स ठेवून पोलिसांवर प्रत्येक चौका चौका मध्ये त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून आरती ने ओवाळण्यात आले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रविण सिरसाट, पो हे काँ. कोठावळे, शैलेश चौगुले, मनोज जाधव, कवडे, फिरोज तडवी, मेंहदी , अमोल अवघडे आदी पोलिस कर्मचाऱ्याच्यावर फुलांचा वर्षाव करणायत आला.
यावेळी आर.टी.शिरसागर, विकास गिराम ( माजी सैनिक ), अशोक मोरे सह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.