कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच.एस. पाटील हे दि १२ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. पाटील यांनी प्राचार्य पदाची धुरा पाच वर्षे सांभाळली. बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने प्राचार्य डॉ. एच. एस. पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
बार्शीतील झाडबुके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पाटील सेवानिवृत्त; प्रभारी प्राचार्य पदी डॉ. मनोज गादेकर
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या खजिनदार वर्षाताई ठोंबरे या होत्या. महाविद्यालयाचे नवनिर्वाचित प्रभारी प्राचार्य डॉ मनोज गादेकर यांच्या हस्ते डॉ. एच.एस. पाटील यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या वतीने प्राचार्य डॉ. एच. एस. पाटील यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी मनस्वी शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. मनोज गादेकर यांचा सत्कार संस्थेच्या खजिनदार वर्षाताई ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांना प्रभारी प्राचार्य पदाची धुरा सांभाळण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, प्राचार्य पाटील यांचे कुटुंब उपस्थित होते.