fbpx

बार्शीतील माहिती अधिकार कार्यकर्त्याचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी:
सोलापूर जिल्हा मधील बार्शी येथील माहिती अधिकार कार्यकर्ते दीनानाथ काटकर यांचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात येथे गुन्हा दाखल झालेला आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, बार्शीतील माहिती अधिकार कार्यकर्ते दीनानाथ काटकर हे शनिवार दि. १० जुलै रोजी कार्यालय/ दुकान बंद करून अंदाजे दहाच्या दरम्यान घरी गेले. त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी सव्वा नऊच्या दरम्यान कार्यालयकडे आले. त्यावेळी त्यांना ऑफिसचा मुख्य दरवाजा हा उचकटलेला, तोडलेला व त्यातील काही लाकडी भाग हा तुटून खाली पडलेला दिसला. त्यानंतर त्यांनी कोणत्याही वस्तूला हात न लावता तात्काळ पोलीसांना फोन करून फोनवरून सविस्तर हकिकत सांगितली. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली आणि पंचनामा केला.

याबाबत दीनानाथ काटकर यांनी असे सांगितले की, माझे अनेक महत्त्वाचे कागदपत्रे, मौल्यवान वस्तू या कार्यालयामध्ये असतात, अनेक सामाजिक विषय मी हाताळत आहे. माहिती अधिकारात आलेल्या माहित्या देखील ऑफिसमध्ये असतात. सध्या काटकर हे काही सामाजिक प्रकरणे व काही महत्वाची प्रकरणे हाताळत आहेत तसेच अनेक प्रकरणांची खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा चालू आहे तर काही न्यायप्रविष्ट आहेत, तसेच काही प्रकरणे कोर्टात जाण्याच्या मार्गावर आहेत असे असताना असा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे, अधिक तपास पोलीस हवालदार महेश दत्तात्रय मुंडे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *