कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: बार्शी तालुक्यातील पांगरीत डॉक्टर दिनानिमित्त डॉक्टरांचा सन्मान कुतूहल परिवार व महाराष्ट्र राज्य ग्राहक समितीच्या वतीने येथील ग्रामीण रुग्णालयात पार पडला. यावेळी शासकीय व खाजगी सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
बार्शी तालुक्यातील पांगरीत डॉक्टर दिनानिमित्त डॉक्टरांचा सन्मान
यावेळी ॲड. अनिल पाटील म्हणाले की, ग्रामीण रूग्णालयाशी माझ्या भावना जोडल्या गेलेल्या असून रुग्णालयाच्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच प्रगतीसाठी प्रयत्न करेन.
या ग्रामीण रुग्णालयात पूर्वी लाड व पाटील डॉक्टरांनी कौतुकास्पद काम केले. आज पण त्यांचे नावे आदरांनी घेतली जातात. त्याचप्रमाणे तुम्ही ही असेच काम कराल, अशी आशा कुतूहल परिवाराचे अध्यक्ष प्रा. विलास जगदाळे यांनी व्यक्त केली.
यावेळी माजी जि.प. सदस्य संजीव बगाडे, शहाजी धस, डॉ. रवींद्र माळी यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. विलास लाडे, डॉ. देशमुख, डॉ. आरिफ शेख, उपसरपंच धनंजय खवले, ॲड. रियाज बागवान, गणेश गोडसे, सोमनाथ नारायणकर, सुनील वाघमारे, माजी सभापती कौशल्या माळी, ग्राहक समिती बार्शी तालुकाध्यक्ष विष्णू पवार, बाबासाहेब शिंदे, कुतूहलचे संपादक इर्शाद शेख व आरोग्य कमर्चारी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन कुतूहलचे वृत्तसंपादक तात्या बोधे यांनी केले.