कुतूहल न्यूज नेटवर्क : प्रतिनिधी विजयकुमार मोटे
पंढरपूर शहर उद्यापासून पुढील तीन दिवस बंद
पंढरपूर : करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता तो रोखण्यासाठी पंढरपूर शहर उदयापासून पुढील तीन दिवस बंद राहणार असल्याचे नगरपरिषदने जाहिर केले आहे. बुधवार दि.२२ एप्रिल ते शुक्रवार दि.२४ एप्रिल २०२० या तीन दिवसात संपुर्ण शहारातील सर्व दुकाने (मेडिकल व हॉस्पिटल सोडून) बंद ठेवण्यात येणार आहेत.
शहरातील सर्व दुकाने (मेडिकल व हॉस्पिटल सोडून) बंद राहतील. या तीन दिवसात अत्यावश्यक सेवेतील दुध विक्री सेवा सकाळी ७ ते ९ या वेळेतच सुरु राहतील. मेडिकल व हॉस्पिटल सोडून इतर सर्व दुकाने, फळे व भाजीपाला विक्री देखील या दिवशी बंद राहतील. तरी पंढरपूर शहरातील सर्व व्यावसायिकांनी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आपली दुकाने बंद ठेवावीत व हे तीन दिवस कोणत्याही नागरीकांनी घराबाहेर पडु नये असे आवाहन नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, गटनेते गुरुदास अभ्यंकर, विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे, सर्व सभापती नगरसेवक व नगरसेविका यांनी केले आहे.