कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: मळेगाव येथील व बी.पी सुलाखे हायस्कूल बार्शी येथे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी तेजस्विनी संतोष निंबाळकर हिने दहावीच्या परीक्षेमध्ये ९९ टक्के गुण घेऊन यश संपादन केले. त्याबद्दल बार्शी तालुका सावता परिषदेच्या वतीने तिचा मळेगाव येथील निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी उपसरपंच संतोष निंबाळकर, गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माळी, श्री शिवाजी तरुण कला क्रीडा व बहुउद्देशीय मंडळाचे उपाध्यक्ष नितीन पवार, सावता परिषदेचे तालुका युवक अध्यक्ष अशोक माळी, सुरेश कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.