कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद: आसिफ मुलाणी
उस्मानाबाद तालुक्यातील कारी येथील यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचलित श्री शिवाजी विद्यालयाचा दहावीच्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून यशाची परंपरा कायम ठेवली आहे. अविष्कार दिलीप भराडे (९६ टक्के गुण), साक्षी दत्तात्रय सारंग (९४.६० टक्के गुण), कृष्ण दिलीप जगताप (९४ टक्के गुण) या विद्यार्थी व विद्यार्थिनी ने विद्यालयातून प्रथम, द्वितीय, तृतीय येण्याचा मान मिळवला.
कारीतील श्री शिवाजी विद्यालयाचा १०० टक्के निकाल
यामध्ये ३६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले तर ३१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मनोहर सपाटे, संस्थेचे सचिव डॉ. अनिल बारबोले, शाळेचे मुख्याध्यापक एम .एस. भुसारे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.