कुतूहल न्यूज नेटवर्क
नाशिक: नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीमध्ये एका अपघातात एकाच शाळेतील तीन शिक्षक जागीच मृत्यू झाला आहे. दिंडोरीमध्ये आर्टिका गाडीवर झाड कोसळून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.
चालत्या गाडीवर कोसळले झाड; एकाच शाळेतील तीन शिक्षक जागीच ठार
असा झाला अपघात
२१ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एम. एच. एफ. एन. ०९९७ या पांढऱ्या रंगाच्या मारुती आर्टिगा वनीकडून नाशिककडे जात होती. दरम्यान, वलखेड फाट्यावर फॉर्च्यून कंपनी जवळ गाडी पोहचताच त्याच्यावर अचानक झाड कोसळले. या अपघातात गाडीच्या मागील सीटवर बसलेले तीन शिक्षक दत्तात्रय गोकुळ बच्छाव (वय ५१ ) राहणार किशोर सूर्यवंशी मार्ग दिंडोरी रोड नाशिक. रामजी देवराम भोये (वय ४९) नाशिक नितीन सोमा तायडे( वय ३२) रा रासबिहारी लिंक रोड नाशिक. हे जागीच ठार झाले.