fbpx

अक्कलकोट शहरात आदर्श उद्यान उभे करणार – नगराध्यक्षा शोभाताई खेडगी

कुतूहल न्यूज नेटवर्क
अक्कलकोट: दयानंद गौडगांव, दि.२३ – शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या कारंजा चौकातील ऐतिहासिक श्रीमंत राजमाता तारामाता उद्यानाचा कायापालट करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला असून पुढील काही महिन्या भरात या उद्यानचा सर्वांगिण विकास करुन आदर्श उद्यान उभे करणार असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा शोभाताई खेडगी यांनी केले.

प्रज्ञापुरी अक्कलकोट निवासी श्री वटवृक्ष स्वामी महाराज यांच्या दर्शनासाठी देश – विदेशातील येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन हा उद्यान विकसित करणार आहे. शासनाने हा उद्यान विकसित करण्यासाठी सुमारे १ कोटी ४९ लाख ९९ हजार ४ रुपये मंजूर केली आहे. या उद्यान विकास कामाचा शुभारंभ शुक्रवारी गुरुपौर्णिमानिमित्त वीरशैव लिंगायत विरक्त मठाचे मठाधिपती श्री. बसवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्षा शोभाताई खेडगी बोलत होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, मुख्याधिकारी सचिन पाटील, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, नगरसेवक महेश इंगळे, बसलिंगप्पा खेडगी, उत्तम गायकवाड, सदाम शेरीकर, अंबण्णा चौगुले, जितेश यारोळे, विकास मोरे, आलम कोरबू, छोटू पवार, शयबाज यळसंगी, नगरपरिषदेचे बांधकाम विभाग प्रमुख भागवत सांगोलकर, अधीक्षक मलिक बागवान, विठ्ठल तेली, मल्लिनाथ स्वामी, नवनाथ शिंदे, वैशाली नन्ना उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे म्हणाले, शहरातील रहिवाशांसाठी शहराजवळ सर्वागसुंदर निसर्ग उद्यान असावे. पक्षी, निसर्गसंपदेचा शहरवासीयांना लाभ घेता यावा. या विचारातून उद्यान सहकार्याने विकसित करणार आहे. या उद्यानमध्ये विविध सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. देशी-विदेशी पर्यटकांसाठी हा परिसर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल, अशा पद्धतीने ते विकसित करण्यात येणार आहे. त्यात निसर्ग उद्यान यांसह विविध उद्यानांची निर्मिती केली जाणार आहे.

तसेच नगरसेवक उत्तम गायकवाड म्हणाले, या उद्यानाच्या माध्यमातून या भागात पर्यटनस्थळ विकसित झाले तर येथे रोजगाराच्या संधी निर्माण होतील. स्थानिक रहिवाशांना रोजगार मिळेल. त्यांना या उद्यान प्रकल्पात सहभागी करून निसर्ग संवर्धनाच्या कामात जोडले जाणार आहे, असे यावेळेस सांगण्यात आले.

‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये     200 रुपये     500 रुपये     Any Amount

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *