कुतूहल न्यूज नेटवर्क
मुंबई: ‘राजकुमार’ गेल्या वर्षीच प्रदर्शित होणार होता. मात्र, लॉकडाऊनमुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलले गेले. आता परिस्थितीत सुधार होताना दिसत असल्यामुळे निर्मात्यांनी हा सिनेमा एस आर एफ टाॅकीज युट्युब चॅनेल (SRF Talkies Youtube Channel) ला प्रदर्शित केला आहे. हा सिनेमा निर्मात्यानी वेगळ्या स्वरूपात रिलीज केला आहे, तो म्हंजे तुम्ही आधी सिनेमा बघा, बघुन झाल्यावर पैसे द्या, आसा एक आगळा वेगळा प्रयोग या निर्मात्याने केला आहे.
‘राजकुमार’ मोठ्या बजेटचा सिनेमा युट्युबवर प्रदर्शित
अभिनेता भाऊसाहेब शिंदे यांना ‘ख्वाडा’ तील भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेता, राष्ट्रीय पुरस्कार – स्पेशल ज्युरी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते व ‘ख्वाडा’ला ही उत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होतो. साहजिकच अशा अभिनेत्यांकडून चांगल्या कामाची अपेक्षा असते. भाऊसाहेब शिंदे अभिनित २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘बबन’ चित्रपटातील बबन आणि कोमलची म्हणजेच भाऊसाहेब शिंदे आणि गायत्री जाधवची केमिस्ट्री प्रेक्षकांनाही खूपच भावली. आता हीच जोडी पुन्हा पडद्यावर ‘राजकुमार’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. लॉकडाऊनमुळे थेटरला बंद आसल्या कारणाने प्रोड्युसर मोठ्या आडचनित आला आसून त्यांनी राजकुमार हा मोठ्या बजेट आणि स्टारकास्ट चा सिनेमा युट्युब चॅनेलला रिलीज करण्याचे धाडस दाखविले आहे.
एस आर एफ प्रॉडक्शन प्रस्तुत ‘राजकुमार’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन समर्थ राज इडिगा यांनी केले असून, त्यांचे हे दिग्दर्शनीय पदार्पण आहे. समर्थ यांनी हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. ‘राजकुमार’ गेल्या वर्षीच प्रदर्शित होणार होता. मात्र, लॉकडाऊनमुळे ते शक्य झाले नाही, आता परिस्थितीत पाहाता निर्मात्यांनी हा सिनेमा युट्युबवर प्रदर्शित केला आहे. राजकुमार हा सिनेमा तुम्ही पैसे न देता पाहू शकता, पण सिनेमा बघुन झाल्यावर तुम्हाला या सिनेमा चे पैसे द्यायचे आहे, तेही तुमच्या ईच्छे नुसार, तुम्ही कितीही देऊ शकतां.
केजीएफ फेम अर्चना जॉईस यांची भूमिका भाऊसाहेब शिंदे, गायत्री जाधव यांच्यासोबतच ‘राजकुमार’मध्ये प्रवीण विठ्ठल तरडे, देविका दफ्तरदार, राष्ट्रीय पुरस्कार विजेता बालकलाकार श्रीनिवास पोकळे आणि अर्चना जॉईस यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अर्चना जॉईस यांनी २०१८ ला प्रदर्शित झालेल्या के.जी.एफ.( K.G.F.) या हिंदी चित्रपटामध्ये काम केले असून त्यांचा ‘राजकुमार’ हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. तुम्हाला हा सिनेमा युट्युबवर बघायला मिळणार आहे, व सिनेमा बघुन झाल्यावर तुमच्या इच्छेनुसार त्याचे पैसे द्यायचे आहे. प्रेषक आमच्या आवाहनाला प्रतिसाद देतील, अशा विश्वास राजकुमारच्या टीमने व्यक्त केला आहे.