कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: बार्शी तालुक्यातील पांगरी येथील राजीव गांधी केंद्रीय आश्रम शाळेत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेच्या प्रांगणामध्ये प्रमुख पाहुण्यांच्या व संस्थेचे संचालक शिवाजी चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
पांगरीत अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक यांना अभिवादन

याप्रसंगी भारत मोरे व सुभेदार बळीराम बगाडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष प्रा संजीव बगाडे यांनी महापुरुषांचे कार्य विशद केले. कार्यक्रमाची प्रस्तावना उपमुख्याध्यापक रामकृष्ण मुळे यांनी केले तर सूत्रसंचालन शिवाजी बगाडे यांनी केले व आभार अधीक्षक वाहिद शेख यांनी मानले. कार्यक्रमास चंद्रकांत बगाडे, गणेश गोडसे, संजय सोनवणे, शैलेश पाच भाई, लखन ढेंबरे, तानाजी चव्हाण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.