fbpx

तुळजापूरचे माजी आमदार आलुरे गुरुजींचे निधन

कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार, शिक्षण प्रसारक मंडळ अणदूर चे संस्थापक सचिव सि. ना. आलूरे गुरुजी यांचे वयाच्या ९० व्या वर्षी सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी पहाटे साडेतीन वाजता निधन झाले. आलुरे हे १९८० मध्ये काँग्रेस पक्षाकडून सर्वप्रथम आमदार झाले होते. शिक्षण आणि सहकार क्षेत्रामध्ये आलूरे गुरुजी यांचे मोठे योगदान राहिले आहे. आज दुपारी तीन नंतर त्यांच्या पार्थिवावर अणदूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये     200 रुपये     500 रुपये     Any Amount

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *