कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: गौडगाव ता. बार्शी येथील सहारा वृद्धाश्रमास करुणा धनंजय मुंडे यांच्या वतीने कॉटगाद्या व किराणा साहित्य भेट देण्यात आले. करुणा मुंडे या जीवन ज्योत सामाजिक सेवा संस्था या संस्थेच्या माध्यमातून मुंबई येथे विविध क्षेत्रात काम करत आहेत. त्या संस्थेच्या माध्यमातून आंदोलने, सामाजिक उपक्रम तसेच महिलांच्या न्याय हक्कासाठी लढत आहेत. त्यांनी सहारा वृद्धाश्रमाची दखल घेऊन वृद्धाश्रमास कॉटगाद्या व किराणा साहित्य भेट देऊन एक सामाजिक बांधिलकी जपली आहे. यावेळी रणजीत गरड, किरण संकपाळ, बालाजी गोरे, विनोद सोनवणे व सहारा वृद्धाश्रमाचे अध्यक्ष राहुल भड उपस्थित होते.