कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : संत निरंकारी मंडळ शाखा बार्शी यांच्यावतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वानेवाडी ता. बार्शी येथे २०० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत जाधव व संत निरंकारी मंडळाचे विक्रम क्षिरसागर यांच्या हस्ते संपन्न झाले.
संत निरंकारी मंडळाच्या वतीने वानेवाडीत वृक्षारोपण

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी विस्तार अधिकारी जाधव म्हणाले की, वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख उकिरडे, किशोर ढोले, सरपंच बापूराव गरदडे, राहुल लोखंडे, ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी कर्मचारी, मुख्याध्यापक शामसुंदर शिंदे, राजेंद्र चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जमाने यांनी केले.