कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२०-२१ वर्षांमधील एनसीसी विभागाचा सी सर्टिफिकेटचा निकाल लागला असून यामध्ये १३ मुले व ३ मुली उत्तीर्ण आणि बी सर्टिफिकेट निकालांमध्ये २० मुले व ६ मुली उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम. बी गादेकर, जेसीओ संजय गावीसाब, बाबू टेकणार, हवालदार प्रवीण ढोरे, एनसीसीचे साजिद शेख उपस्थित होते.
श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयातील एनसीसी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप
