कुतूहल न्यूज नेटवर्क
ठाणे : आधी केलेले पाप धुवून काढा, मगच आशीर्वाद मागा, असा मजकूर असलेले अनेक फलक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठाणे शहरातील विविध पेट्रोल पंपांच्या बाहेर लावले आहेत. एकीकडे सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर अधिक आर्थिक बोजा वाढत आहे. कोरोनाचे धोका कायम आहे. अशातच भाजपने जन आशीर्वाद यात्रा काढल्याने विरोधक चांगलेच आरोप करत आहेत.
‘आधी केलेले पाप धुवून काढा, मगच आशीर्वाद मागा’; राष्ट्रवादीची बॅनरबाजी
या बॅनरवर भाजपची जनआशीर्वाद यात्रा, पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसचे दर गगनाला भिडले, आधी केलेलं पाप धुवून काढा, मगच आशीर्वाद मागा, असा मजकूर छापून इंधनाचे दरपत्रकही छापण्यात आले आहे.

‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount