कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : आयटक संलग्न डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल श्रमिक संघच्या वतीने पूरग्रस्तांसाठी ८१ हजार ४०० रुपयांचा निधी कामगारांच्या वतीने देण्यासाठी जमा करण्यात आला. ही रक्कम एक लाख एक हजार व्हावी यासाठी श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष नंदन जगदाळे यांनी या रकमेमध्ये १९ हजार ६०० रुपये जमा केले व ही मिळून होणारी एक लाख एक हजार रुपये रक्कम निवासी नायब तहसीलदार संजीवन मुंडे यांच्याकडे चेकव्दारे संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये सुपूर्द करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार काझी, हवलदार भालेराव हे उपस्थित होते.
डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल श्रमिक संघाने दिला पूरग्रस्तांसाठी १ लाख, १ हजारांचा निधी..!

या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रकाश पाटील, मेडीकल सुप्रींडेंन्ट डॉ. रामचंद्र जगताप, संघटनेचे कार्याध्यक्ष कॉम्रेड लहू आगलावे, सचिव धनाजी पवार, कॉम्रेड प्रविण मस्तुद, डॉ. सुरेश सावंत, डॉक्टर हर्षद बारसकर, डॉ. सुरेखा माळवे, कॉम्रेड भारत भोसले, भारती मस्तुद, महादेव ढगे, बिभीषण हुरकूडे, संगीता गुंड, किसन मुळे, शहापरि शेख, शिवकन्या भोसले आदी उपस्थित होते.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount