fbpx

पांगरी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सिरसट यांची बार्शी शहर पोलीस ठाण्यात बदली

कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी : इरशाद शेख
न्यायप्रिय, कार्यतत्पर, प्रामाणिक, कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक (PSI) प्रवीण सिरसट यांनी आपल्या कामकाजाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्याकडे असलेल्या गुन्ह्यांची (crime) त्यांनी सखोल चौकशी करून आरोपींवर कारवाई करून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सामाजिक स्तरावर शांतता राखणे, जातीय सलोखा राखणे, गुन्ह्यांची उकल होण्याकरीता आपल्या प्रशासकीय कारकीर्दीतील संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.

बार्शी शहर पोलीस ठाण्यात बदली

पांगरी पोलीस ठाणे (Pangri Police Station) येथील पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सिरसट यांची बार्शी शहर पोलीस ठाण्यात (Barshi City Police) बदली करण्यात आली आहे. प्रवीण सिरसट अरणगाव (ता. केज, जि. बीड) येथील भूमिपुत्र असून सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्त्व आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण पूर्ण करून त्यांनी अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेतले. आपल्या खडतर प्रवासातून त्यांनी यश मिळविले.
पांगरी पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील, पत्रकार, लोकप्रतिनिधी व प्रतिष्टीत नागरिकांनी चांगले सहकार्य केले. त्यामुळे माझा कार्यकाळ चांगला जाण्यास मदत झाली त्याबद्दल आभारी आहे.- पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सिरसट

कर्तव्यदक्ष आणि डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून ओळख

गेल्या दोन वर्षांपासून पांगरी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून प्रवीण सिरसट कार्यरत आहेत. त्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ सर्वसामान्यांना न्याय देणारा ठरला असून, अवैध धंदे, तसेच गुंडगिरी मोडीत काढण्याचे काम त्यांनी आपल्या कार्यकाळात केले आहे. लेकीचे झाड हा उपक्रम त्यांनी राबविला. एक कर्तव्यदक्ष आणि डॅशिंग पोलिस अधिकारी म्हणून त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

खडतर सेवा करून पदके मिळवली

गडचिरोली येथील अतिदुर्गम भागातील एटापल्ली तालुक्यातील नक्षल, संवदेनशील अशा हेडरी (सुरजागढ) तीन वर्षे सेवा, आहेरी तालुक्यातील येलचिल ऑट पोस्ट प्रभारी अधिकारी एक वर्ष सेवा, सोलापूर एसपी स्काॅड एक वर्ष सेवा अशा विविध ठिकाणी सेवा करून पोलीस महासंचालक पदक, विशेष सेवा पदक, खडतर सेवा पदक, केंद्रीय गृहमंत्रालयातील अंतरिक सुरक्षा सेवा पदके मिळवली.

‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये     200 रुपये     500 रुपये     Any Amount

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *