कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी : संत निरंकारी मंडळ बार्शी यांच्यावतीने वन विभाग सौंदरे (ता.बार्शी) येथे २०० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गोसावी व संत निरंकारी मंडळाचे विठ्ठल बचुटे यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्याध्यापक गोसावी म्हणाले की, वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. संत निरंकारी मंडळ हे काम निस्वार्थ भावनेतून करत आहे हि अभिमानास्पद बाब आहे.
सौंदरेत वृक्षारोपण; संत निरंकारी मंडळाचा उपक्रम
या कार्यक्रमासाठी किशोर ढोले (सेवादल संचालक), ऋषिकेश शेळके (सेवादल शिक्षक), पोलीस पाटील शिवराज गोटे, सुरेश जाधव, शरद खोसेजी, बावकर ॲड. शाम पाटील, राजेंद्र चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम क्षीरसागर यांनी केले.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount